Karnataka Farmers Protest
esakal
बेळगाव : काँग्रेस सरकारच्या ‘शेतकरी विरोधी’ (Karnataka Farmers Protest) धोरणांविरुद्ध राज्य भाजपच्या वतीने मंगळवारी (ता. ९) सुवर्ण विधानसौधला घेराव घालण्याचा इशारा दिला होता. मात्र, तत्पूर्वी पोलिसांनी (Police) भाजप नेत्यांसह कार्यकर्त्यांना बी. एस. येडियुराप्पा मार्गावर ताब्यात घेतले. शेतकऱ्यांच्या निषेध मोर्चाचे नेतृत्व करणाऱ्या वरिष्ठ भाजप नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने तणाव वाढला. हालगा गावातील महामार्गाजवळ निदर्शकांनी सुवर्ण सौधकडे कूच करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आंदोलकांना ताब्यात घेतले.