प्रदेशाध्यक्ष बदला, घराणेशाहीला पाठिंबा देऊ नका, नाहीतर नवा पक्ष काढेन; भाजपमधून हकालपट्टी झालेल्या नेत्याचा इशारा

Karnataka bjp Expelled Former MLA for 6 years : कर्नाटकातील माजी आमदार बनसगौंडा पाटील यतनाल यांनी नव्या हिंदू पार्टीचे संकेत दिलेत. भाजपने यतनाल यांच्यावर हकालपट्टीची कारवाई केलीय.
karnataka bjp politics
karnataka bjp politicsEsakal
Updated on

पक्षविरोधी कारवाया केल्यानं भाजपने माजी आमदाराची पक्षातून हकालपट्टी केलीय. यानंतर माजी आमदाराने थेट भाजपलाच इशारा दिलाय. भाजपने प्रदेशाध्यक्ष बदलावा आणि घराणेशाहीला पाठिंबा देणं बंद करावं नाहीतर नवा राजकीय पक्ष काढेन जो हिंदूंचा असेल. कर्नाटकातील माजी आमदार बनसगौंडा पाटील यतनाल यांनी नव्या हिंदू पार्टीचे संकेत दिलेत. भाजपने यतनाल यांच्यावर हकालपट्टीची कारवाई केलीय. कारवाईनंतर बसनगौंडा यांनी म्हटलं की, मी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात नाहीय. भाजप माझ्या आईसारखा आहे पण कर्नाटक भाजप आता हिंदूंची रक्षा करण्यासाठी असमर्थ ठरलीय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com