Karnataka Bomb Threat
esakal
बंगळूर : कर्नाटक राज्यातील हसन, मंगळूर, बिदर आणि तुमकुरसह पाच जिल्हाधिकारी कार्यालयांनी बॉम्ब ठेवल्याच्या धमकीचे (Karnataka Bomb Threat) संदेश मिळाल्याची माहिती समोर आणली आहे. जरी प्राथमिक तपासात हा खोडसाळपणाचा प्रकार असल्याचे दिसत असले, तरी सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी प्रकरण गांभीर्याने घेतले आहे. बनावट धमकी पाठवणाऱ्यांचा शोध सुरू असून, दोषींवर कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.