कर्नाटकमध्ये भाजप सरकार तरलं; सहा जागांवर विजय

वृत्तसंस्था
Monday, 9 December 2019

आज मतमोजणीला सुरवात झाल्यापासून भाजपने आघाडी घेतली होती. सध्या जाहीर झालेल्या सात जागांपैकी सहा जागांवर भाजपने विजय मिळविलेला आहे. त्यामुळे येडियुरप्पा सरकारला कोणताही धोका नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या विजयानंतर येडियुरप्पा यांच्या मुलाने त्यांना पेढा भरवत त्यांचे अभिनंदन केले आहे.

बंगळूर : कर्नाटकात बी. एस. येडियुरप्पा यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार तरल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजपला सरकार टिकण्यासाठी आवश्यक असलेल्या सहा जागा जिंकण्यात यश आले आहे. विधानसभेच्या 15 जागांवर झालेल्या पोटनिवडणुकीचा आज (सोमवार) निकाल लागला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच अॅप

आज मतमोजणीला सुरवात झाल्यापासून भाजपने आघाडी घेतली होती. सध्या जाहीर झालेल्या सात जागांपैकी सहा जागांवर भाजपने विजय मिळविलेला आहे. त्यामुळे येडियुरप्पा सरकारला कोणताही धोका नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या विजयानंतर येडियुरप्पा यांच्या मुलाने त्यांना पेढा भरवत त्यांचे अभिनंदन केले आहे.

Video : अजित पवार म्हणतात, चिंता नको; देवेंद्रसोबत हवापाण्याच्या गप्पा मारल्या

कर्नाटकमधील एच. डी. कुमारस्वामी यांचे सरकार कोसळल्यानंतर येडियुरप्पा यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेत आले होते. आमदारांच्या बंडखोरीनंतर होत असलेल्या विधानसभेच्या 15 जागांवरील पोटनिवडणुकीचा निकाल आज लागले. कर्नाटक विधानसभेच्या 15 मतदारसंघांसाठी पोटनिवडणुकीत सुमारे 66.49 टक्के मतदान झाले होते. येडियुरप्पा यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारच्या स्थैर्यासाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची होती. 

Video : मला उपमुख्यमंत्री करावं पण... : अजित पवार

काँग्रेस आणि जेडीएसमधील 17 आमदारांनी बंडखोरी शस्त्र उपसले होते. बंडखोरीमुळे कुमारस्वामी यांचे सरकार जुलै महिन्यात कोसळले. त्यानंतर कर्नाटकात मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांच्या नेतृत्वाखाली भाजपने सरकार स्थापन केले. 224 सदस्यसंख्या असलेल्या कर्नाटक विधानसभेच संख्याबळ 17 आमदारांच्या बडतर्फीनंतर 208 वर आले होते. त्यानंतर येडियुरप्पा यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला होता. सध्या भाजपाचे 105 आमदार आहेत. आता संख्याबळ वाढले तरी येडियुरप्पा यांच्याकडे पुरेसे संख्याबळ असणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Karnataka bypoll election BS Yediyurappa government officially wins Karnataka by-poll battle