

“Siddaramaiah arrives in Delhi as cabinet reshuffle talks intensify in Karnataka.”
Sakal
बंगळूर : राज्याच्या राजकारणात नेतृत्व बदल आणि मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चांनी जोर धरला असतानाच मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या दिल्ली भेटीमुळे उत्सुकता वाढली आहे. आज दुपारी नवी दिल्लीत पोहोचलेल्या मुख्यमंत्र्यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेऊन मंत्रिमंडळ फेरबदलाबाबत महत्त्वाची चर्चा करण्याचे नियोजन केले आहे.