बंगळूर : कर्नाटकात चर्चेत असलेला जात जनगणनेचा (Karnataka Caste Survey) मुद्दा आता अधिकच गंभीर होत चालला आहे आणि जनगणनेबद्दल अधिक माहिती आता समोर आली आहे. २०१५ च्या सर्वेक्षणात लोकसंख्येचे (Population) आकडे आधीच उघड झाले आहेत.
ज्यामुळे प्रत्येक समुदाय किती वाढला आहे, हे उघड झाले आहे. त्यापैकी लीक झालेल्या अहवालात असे उघड झाले आहे की, गेल्या ३० वर्षांत मुस्लिम लोकसंख्या ९० टक्के वाढली आहे. त्याचप्रमाणे अनुसूचित जाती समुदायाची (Scheduled Caste Communities) लोकसंख्याही लक्षणीय वाढली आहे.