बंगळूर : सहायक प्राध्यापक अब्दुल मजीद यांनी बी.ए.च्या द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना प्रार्थनास्थळात शैक्षणिक सहलीदरम्यान हिजाब घालण्यास (Karnataka Hijab Controversy) भाग पाडल्याच्या आरोपांची कर्नाटकच्या केंद्रीय विद्यापीठाने (सीयुके) चौकशी सुरू केली आहे. विद्यापीठाचे कुलसचिव आर. आर. बिरादार यांनी पुष्टी केली की, हैदराबाद येथील कायदेशीर हक्क संरक्षण मंचाचे सरचिटणीस ए. संतोष यांनी २६ जुलै रोजी या संदर्भात तक्रार दाखल केली होती.