
ऑनलाइन गेमिंगवरील कायदा होताच, अंमलबजावणी संचालनालयाने मोठी कारवाई केली आहे. ऑनलाइन बेटिंग आणि गेमिंग रॅकेटवर कारवाई करत ईडीने कर्नाटकचे चित्रदुर्गाचे आमदार केसी वीरेंद्र यांना गंगटोक येथून अटक केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय एजन्सीने बेंगळुरू, चित्रदुर्ग, मुंबई, गोवा आणि गंगटोकसह ३१ ठिकाणी छापे टाकले. गोव्यातील पाच मोठ्या कॅसिनोवरही छापे टाकण्यात आले.