

कर्नाटकातील चित्तदुर्ग जिल्ह्यात गुरुवारी सकाळी राष्ट्रीय महामार्ग ४८ वर एक भयावह रस्ता अपघात घडला. गोरलाथू गावाजवळ बंगळुरूहून शिमोगाकडे जाणाऱ्या खाजगी बसची समोरून येणाऱ्या लॉरीशी जोरदार टक्कर झाली. या धडकेनंतर बसला लगेच आग लागली आणि त्यात अडकलेल्या प्रवाशांचा जळून मृत्यू झाला. या दुर्घटनेत आतापर्यंत १७ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे, तर किमान नऊ जण गंभीररीत्या जखमी झाले आहेत.