Accident : कामावरुन घरी परताना काळाचा घाला; रिक्षा-ट्रकच्या भीषण धडकेत 7 महिला ठार, तर 6 जण जखमी

या महिला मजूर असून काम करून रिक्षातून घरी परतत होत्या.
Karnataka Chittaguppa 7 Women Killed in Bidar Accident
Karnataka Chittaguppa 7 Women Killed in Bidar Accidentesakal
Summary

या महिला मजूर असून काम करून रिक्षातून घरी परतत होत्या.

बिदर : कर्नाटकच्या चित्तगुप्पा तालुक्यातील (Karnataka Chittaguppa) एका गावात शुक्रवारी रात्री उशिरा ऑटो रिक्षा (Auto Rickshaw) आणि ट्रकची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात 7 महिलांचा (Women) मृत्यू झाला असून 6 जण जखमी झाले आहेत.

या महिला मजूर असून काम करून रिक्षातून घरी परतत असताना बेमलाखेडा येथील शासकीय शाळेजवळ ट्रकनं रिक्षाला जोरदार धडक दिली. पार्वती (40), प्रभावती (36), गुंडम्मा (60), यदम्मा (40), जगम्मा (34), ईश्वरम्मा (55) आणि रुक्मिणीबाई (60) अशी मृत महिलांची नावं आहेत, असं पोलिसांनी सांगितलं. सहा जखमींमध्ये दोन्ही वाहनांच्या चालकांचाही समावेश आहे. जखमींपैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याचं पोलिसांनी सांगितलं. याप्रकरणी गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.

Karnataka Chittaguppa 7 Women Killed in Bidar Accident
Accident : दिवाळी, छठपूजा संपवून महाराष्ट्रात परतणाऱ्या मजुरांवर काळाचा घाला; बस-कारच्या धडकेत 11 जण ठार

कर्नाटकात रस्ते अपघातात वाढ

या वर्षी 15 ऑगस्टला बिदरमध्येच एक मोठा अपघात झाला होता. यामध्ये हैदराबाद-मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील बांगूर चेकपोस्टजवळ 5 जण ठार तर 4 जण जखमी झाले होते. मृत्युमुखी पडलेले सर्वजण एकाच कुटुंबातील होते. कार चालकाचाही जागीच मृत्यू झाला. हे सर्व हैदराबादमधील बेगमपेट येथील रहिवासी होते. तसंच चित्रदुर्ग इथं रस्ता दुभाजकावर कार आदळल्यानं तीन जण ठार तर दोन जण गंभीर जखमी झाले. पर्यटक गेस्ट हाऊसजवळ हा वेदनादायक अपघात घडला. याबाबत वाहतूक पोलीस अधिकाऱ्यांनी माहिती दिली.

Karnataka Chittaguppa 7 Women Killed in Bidar Accident
एका सुफी विचारवंताच्या नजरेतले हिंदुत्व

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com