Karnataka CM: सिद्धरामय्या की डीके? सोनिया गांधी अन् राहुल गांधींमध्ये CMपदावरून मतभेद

कर्नाटकात काँग्रेसनं घवघवीत यश मिळवल्यानंतर आता मुख्यमंत्रीपदावरुन खल सुरु आहे.
Karnataka CM
Karnataka CMEsakal

नवी दिल्ली : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आता तीन दिवस झाले. पण काँग्रेसकडून मुख्यमंत्रीपदाचं नाव निश्चित होऊ शकलेलंन नाही. मुख्यमंत्री निवडीसाठीची ही कसरत अनेक नेत्यांना बंगळुरुतून दिल्लीपर्यंत घेऊन गेली आहे. मुख्यमंत्रीपदाच्या रेसमध्ये सर्वात पुढे नाव आहे डीके शिवकुमार आणि सिद्धरामय्या यांचं. पण या दोन्ही नावांवरुन काँग्रेस हायकमांड राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्यातही मतभेद असल्याचं कळतंय. (Karnataka CM Siddaramaiah or DK Shivkumar differences between Sonia Gandhi and Rahul Gandhi)

Karnataka CM
Supreme Court: EWSचं आरक्षण कायम राहणार; सुप्रीम कोर्टानं फेटाळली फेरविचार याचिका

राहुल गांधी यांचं कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदासाठी सिद्धरामय्या यांच्या नावाला पसंती असल्याचं सूत्रांकडून कळतं आहे. तर डीके शिवकुमार हे सोनिया गांधींशी चांगले संबंध आहेत. पण सिद्धरामय्या यांना अनेक आमदारांचा पाठिंबा देखील आहे. तसेच काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे हे देखील दोघांपैकी कोणा एकाचं नाव निश्चित करु शकलेले नाहीत. तर काँग्रेसचे वरिष्ठ नेते रणदीप सुरजेवाला हे या दोन्ही उमेदवारांबाबत तटस्थ आहेत.

Karnataka CM
Marathi Movie Issue: मराठी सिनेमा-थिएटर वादावर सरकारचा महत्वाचा निर्णय; पालन न झाल्यास १० लाखांचा दंड

दरम्यान, आज दिवसभर मुख्यमंत्रीपदाचं नाव निश्चित करण्यासाठी दिल्लीत दिवसभर गाठीभेटी, बैठका पार पडल्या. कालच केंद्रीय निरिक्षण समितीनं काँग्रेस अध्यक्ष खर्गेंकडं आमदारांचा कल कोणाच्याबाजूनं आहे, याबाबतचा अहवाल दिला होता. त्यानंतर खर्गे हा अहवाल घेऊन सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याकडे गेले होते. तसेच सिद्धरामय्या आणि शिवकुमार या दोघांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटी घेतल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com