
कोरोना महामारीचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. कोरोनाचा संसंर्ग रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून देशात सलग चार लॉकडाउन लादण्यात आले. लॉकडाउनचे चौथे सत्र 31 मे रोजी संपत आहे. यापूर्वी अनेक राज्य सरकारांनी लॉकडाउनमध्ये अनेक निर्बंध शिथिल केले आहेत. अशात कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी लॉकडाउनचे चौथे सत्र संपल्यानंतर 1 जूनपासून राज्यातील धार्मिक स्थळे उघडण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यांनी यासंबंधीचे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिले आहे.
बंगळुरू - कोरोना महामारीचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. कोरोनाचा संसंर्ग रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून देशात सलग चार लॉकडाउन लादण्यात आले. लॉकडाउनचे चौथे सत्र 31 मे रोजी संपत आहे. यापूर्वी अनेक राज्य सरकारांनी लॉकडाउनमध्ये अनेक निर्बंध शिथिल केले आहेत. अशात कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी लॉकडाउनचे चौथे सत्र संपल्यानंतर 1 जूनपासून राज्यातील धार्मिक स्थळे उघडण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यांनी यासंबंधीचे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिले आहे.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
covid-19 च्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या काळात देशातील सर्व धार्मिक स्थळे बंद ठेवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता. धार्मिक स्थळी लोक मोठ्या प्रमाणात एकत्र येतात. त्यामुळे लोकांमध्ये सोशल डिस्टेंसिंगचे पालन होत नाही. परिणामी कोरोनाचा प्रसार होण्याचा धोका संभवतो. या बाबींचा विचार करुन धार्मिक स्थळे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
कोरोनाविरुद्धची लढाई कमकुवत करण्याचा राहुल गांधींचा प्रयत्न; भाजपनेत्याचा पलटवार
राज्यात 1 जूनपासून मंदिरे उघडण्यासाठी केंद्र सरकारच्या परवानगीची वाट पाहात आहोत, असं येडियुरप्पा म्हणाले आहेत. पंतप्रधान मोदी यांना याबाबत पत्र लिहिलं असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
कर्नाटकमध्ये येडियुरप्पा यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार सत्तेत आहे. भाजप शासित राज्य लॉकडाउनमध्ये कसल्याही प्रकारची सूट देण्याआधी केंद्र सरकारच्या निर्देशांची वाट पाहात आहेत. त्यामुळे केंद्र सरकार येडियुरप्पा यांना धार्मिक स्थळे उघडण्याची परवानगी देते का, हे पाहावं लागेल.
देशात covid-19 रुग्णांची संख्या 1.51 लाखांपुढे; महाराष्ट्राची स्थिती चिंताजनक
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात कर्नाटक राज्य इतर राज्यांच्या तुलनेत बऱ्यापैकी यशस्वी झाल्याचं दिसत आहे. कारण राज्यात आतापर्यंत 2188 कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. तर 44 जणांनी यात आपला जीव गमावला आहे. तसेच या व्हायरसमधून बरे होणाऱ्यांची संख्याही कर्नाटकमध्ये मोठी आहे.
दरम्यान, देशभरात कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्य़ाने वाढ होत आहे. संसर्ग रोखण्यासाठी देशात लॉकडाउन घोषीत करण्यात आला. मात्र, लॉकडाउनचा कालावधी वाढत गेल्याने जनतेमध्ये अस्वस्थता आहे. अशावेळी राज्य सरकारे आपापल्या राज्यात लॉकडाउनची निर्बंध शिथिल करताना दिसत आहेत. तसेच लॉकडाउनचे चौथे सत्र संपल्यानंतर राज्य सरकारे निर्बंध अधिक सैल सोडण्याची शक्यता आहे.