CM Siddaramaiah
esakal
देश
'सिद्धरामय्यांना मुख्यमंत्रिपदावरून हटवणे काँग्रेससाठी धोक्याचे'; 'अहिंद' समुदायाचा काँग्रेस हायकमांडला कठोर इशारा
AHINDA Groups Warn Congress Over Possible Leadership Change : कर्नाटकमध्ये मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या बदलाच्या चर्चेला ‘अहिंद’ समुदायाने कडाडून विरोध केला आहे. नेतृत्वबदल पक्षासाठी घातक ठरेल, असा इशारा केएसएफबीसीसीने काँग्रेसला दिला आहे.
बंगळूर : मुख्यमंत्रिपदावरून सिद्धरामय्या (CM Siddaramaiah) यांना हटवण्याच्या चर्चेला वेग आला असताना ‘अहिंद’ (अल्पसंख्याक, मागासर्गीय, दलित) समुदायांनी काँग्रेस हायकमांडला (Congress High Command) कठोर इशारा दिला आहे. मुख्यमंत्री बदलाचा कोणताही निर्णय पक्षासाठी घातक ठरेल, असे मत कर्नाटक राज्य मागासवर्गीय आणि समुदाय आघाडीने (केएसएफबीसीसी) व्यक्त केले.
