Karnataka Politics News
esakal
बंगळूर : प्रदेश काँग्रेसमधील सत्तासंघर्ष (Karnataka Congress Crisis) पुन्हा दिल्लीच्या दारात पोहोचला आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे काल सकाळी अचानक दिल्लीकडे रवाना झाले. विशेष म्हणजे ते उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार (DK Shivakumar) यांच्या गाडीतूनच विमानतळावर गेले. दोघांमध्ये या प्रवासादरम्यान दीर्घ चर्चा झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.