Karnataka Politics
esakal
बंगळूर (कर्नाटक) : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी मंत्री प्रियांक खर्गे आणि आमदार शरथ बाचेगौडा यांच्यासोबत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या दिल्लीतील निवासस्थानी बैठक घेतली. बैठकीत कर्नाटकातील नेतृत्व वादावर गांभिर्याने चर्चा करून पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांना एकंदर परिस्थितीची महिती देण्याचा निर्णय घेण्यात आला. आता सोनिया गांधी या समस्येवर काय निर्णय (Sonia Gandhi Decision) घेणार, याविषयी औत्सुक्य निर्माण झाले आहे.