Karnataka Politics
esakal
बंगळूर : कर्नाटकातील काँग्रेसमध्ये सत्ता वाटपाचा वाद चिघळत असून, मुख्यमंत्री सिद्धरामय्या (CM Siddaramaiah) आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार (DK Shivakumar) यांचे समर्थक आमदार, मंत्र्यांचे राजकीय डावपेच शिगेला पोहोचले आहेत. ‘मला घ्या, मला द्या’ स्वरूपाची सुरू असलेली ही लढत आता खुल्या मैदानात उतरली आहे.