बंगळूर : राज्यातील काँग्रेस सरकार (Congress Government) पाच वर्षे दगडासारखे मजबूत राहील, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सोमवारी (ता. ३०) म्हैसूर येथे ठासून सांगितले. यावेळी त्यांच्या शेजारी असलेल्या उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार (D. K. Shivakumar) यांचा हात आपल्या हातात घेऊन त्यांनी उंच केला आणि म्हैसूर विमानतळावर एकीचे प्रदर्शन केले.