Karnataka Congress Conflict: कर्नाटकात मुख्यमंत्री सिद्धरामय्यांसमोरच "डीके, डीके"च्या घोषणा; काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह पुन्हा उघड!

CM Siddaramaiah and DK Shivakumar : मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मंचावरच झाला राग अनावर कार्यकर्त्यांनाही तिथेट फटकारले
Siddaramaiah and DK Shivakumar

Siddaramaiah and DK Shivakumar

esakal

Updated on

Internal conflict in Karnataka Congress : बंगळुरूमध्ये एका रॅलीदरम्यान मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना राग अनावर झाल्यामुळे, कर्नाटक काँग्रेसमध्ये सुरू असलेला अंतर्गत कलह अन् सत्तासंघर्ष पुन्हा एकदा सर्वासमोर उघड झाला आहे. मनरेगा मुद्द्यांवर काँग्रेसने आयोजित केलेल्या निदर्शनादरम्यान ही घटना घडली, जिथे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांना पक्षाच्या कार्यकर्त्यांचा उघड पाठिंबा मिळाला.

रॅलीदरम्यान, मुख्यमंत्री सिद्धरामय्या रॅलीला संबोधित करण्यासाठी पुढे येताच, काही युवा काँग्रेस कार्यकर्त्यांनी "डीके...डीके" अशी घोषणाबाजी सुरू केली. व्यासपीठावरून वारंवार आवाहन करूनही घोषणा थांबल्या नाहीत. यामुळे संतप्त झालेल्या सिद्धरामय्या यांनी व्यासपीठावरून कार्यकर्त्यांना फटकारले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

या घडामोडीमुळे कर्नाटक काँग्रेसमधील अंतर्गत नेतृत्वातील संघर्ष पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांच्या समर्थकांमधील सत्तेच्या वादावरून पक्षात अस्वस्थता वाढत असल्याचे मानले जाते.

Siddaramaiah and DK Shivakumar
Arijit Singh Retirement : अरिजीत सिंहचा मोठा निर्णय! ‘Playback Singing’ मधून अचानक ‘रिटायरमेंट’ ; लाखो चाहत्यांना धक्का

तथापि, या संपूर्ण घटनेवर पक्ष नेतृत्वाकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. सिद्धरामय्या आणि डी.के. शिवकुमार यांनी यापूर्वी अनेक वेळा सांगितले आहे की ते पक्षाच्या हायकमांडच्या प्रत्येक निर्णयाचा आदर करतील आणि त्यांचे मतभेद सार्वजनिक होऊ देणार नाहीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com