Karnataka Politics News
esakal
बंगळूर : राज्यात काँग्रेसमधील (Karnataka Congress) नेतृत्वबदलाची चर्चा दिवसेंदिवस जोर धरू लागली आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या (CM Siddaramaiah) यांच्या उत्तराधिकाऱ्याबाबत विविध तर्कवितर्क रंगत असताना, आता ‘दलित मुख्यमंत्री’ या मुद्द्यालाही गती मिळाली आहे. काँग्रेसमधील प्रमुख दलित नेते मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत असल्याची चर्चा सुरू असून, विशेषतः चार नेत्यांची नावे यामध्ये पुढे येत आहेत. यात मल्लिकार्जुन खर्गे, डॉ. जी. परमेश्वर, के. एच. मुनियप्पा आणि डॉ. एच. सी. महादेवप्पा यांचा समावेश आहे.