Karnataka Politics
esakal
बंगळूर : राज्यातील नेतृत्व (Karnataka Congress) बदलाच्या चर्चेला पुन्हा एकदा वेग आला आहे. संक्रांतीपर्यंत ‘चांगली बातमी’ मिळेल, असा विश्वास व्यक्त करणारे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार (DK Shivakumar) यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या समर्थकांना विश्वासात घेण्याचे प्रयत्न आणखी वेगवान केले आहेत. याच पार्श्वभूमीवर त्यांनी पुन्हा एकदा सार्वजनिक बांधकाममंत्री सतीश जारकीहोळी यांची भेट घेऊन त्यांच्याशी दीर्घ चर्चा केली.