Karnataka Congress Crisis
esakal
देश
Karnataka Congress Crisis : काँग्रेसमधील 'वादळ' एका क्षणात शांत? सिद्धरामय्या–शिवकुमार यांच्या नाश्त्याच्या बैठकीनंतर दिल्लीत नेमकं काय घडलं?
Karnataka Congress Leadership Crisis Explained : कर्नाटक काँग्रेसमधील नेतृत्व संघर्ष शांत करण्यासाठी सिद्धरामय्या आणि डी. के. शिवकुमार यांची नाश्त्याची बैठक झाली. हायकमांडच्या हस्तक्षेपामुळे वादाला तात्पुरता ब्रेक लागल्याचे दिसत आहे.
बंगळूर : काँग्रेसमधील नेतृत्व बदलाचा संघर्ष (Karnataka Congress Crisis) कोणत्याही क्षणी भडकू शकणारा ज्वालामुखी ठरला असताना, परिस्थिती अचानक शांत झाल्यासारखी दिसत आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार (DK Shivakumar) यांच्या नाश्त्याच्या बैठकीनंतर दोन्ही गटांनी एकतेचा संदेश दिला; मात्र या शांततेमागे खोलवर राजकीय गणित दडलेले आहे. सत्ता वाटपातील गोंधळ खरोखर संपला आहे का की, हा फक्त तात्पुरता तह आहे? पडद्यामागे काय घडत आहे? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
