Karnataka Politics
esakal
कर्नाटक काँग्रेसमध्ये नेतृत्व बदलावरून संघर्ष तीव्र झाला आहे.
डी. के. शिवकुमार समर्थक मुख्यमंत्रीपदाची मागणी करत आहेत.
मल्लिकार्जुन खर्गे आणि वरिष्ठ नेते वाद नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत आहेत.
बी. बी. देसाई
बंगळूर : काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि इतर वरिष्ठ नेत्यांनी (Karnataka Congress leadership Crisis) वारंवार इशारे दिल्यानंतरही कर्नाटकात नेतृत्व बदलावरून सुरू असलेला वाद थांबलेला नाही. त्यामुळे काँग्रेस (Congress) नेतृत्वात स्पष्टपणे अस्वस्थता आणि चिंता दिसून येत आहे. या विषयावर नियंत्रण ठेवण्यासाठी केलेले अल्पकालीन प्रयत्न आणि काही नेत्यांच्या नाराजीपूर्ण प्रतिक्रिया पाहता सरकारच्या प्रतिमेला बसणाऱ्या संभाव्य धक्क्याची भीती व्यक्त होत आहे.