DK Shivakumar Chief Minister latest updates
esakal
बंगळूर : मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेला पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. या सभागृहात आता तिसऱ्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची चर्चा काँग्रेसच्या गोटात रंगू लागली आहे. डी. के. शिवकुमार यांना मुख्यमंत्री होऊन अद्याप फारसा कालावधी झालेला नसतानाच नेतृत्वबदलाची चर्चा सुरू झाल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त होत आहे. या चर्चांना कोणत्या हेतूने हवा दिली जात आहे, याबाबतही तर्कवितर्क सुरू (DK Shivakumar Chief Minister latest updates) आहेत. सध्या ही चर्चा फारशी उघडपणे होत नसली, तरी आगामी काळात तिला अधिक तीव्र स्वरूप येणार का, याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे.