बंगळूर : धर्मस्थळ मृतदेह गुप्त दफन प्रकरण (Dharmasthala Burial Case) अंतिम टप्प्यात पोहोचल्याचे दिसते. दरम्यान, तक्रारदाराने दाखविलेल्या ठिकाणी सांगाडा सापडत नाहीये. धर्मस्थळाविरुद्ध कट रचल्याचा संताप भक्तांमध्ये व्यक्त होत असतानाच उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार (DK Shivakumar) यांनी हे एक मोठे षड्यंत्र असल्याचे विधानसभेत स्फोटक वक्तव्य केले.