Karnataka Election : रात्रंदिवस मेहनत करायला लागली तरी चालेल, पण शेट्टरांना..; येडियुरप्पांचं थेट चॅलेंज

भाजप आणि शेट्टर यांच्यातील वाद अजूनही संपण्याचं नाव घेत नाहीये.
Karnataka Election 2023
Karnataka Election 2023esakal
Summary

कर्नाटकातील सर्व 224 विधानसभा जागांसाठी 10 मे रोजी निवडणूक होणार आहे. तर, 13 मे रोजी मतमोजणी होणार आहे.

Karnataka Election 2023 : कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर (Jagdish Shettar) यांना भाजपनं (BJP) तिकीट नाकारलं होतं. त्यानंतर त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये (Congress) प्रवेश केला. ते हुबळी-धारवाड सेंट्रलमधून काँग्रेसचे उमेदवार आहेत. मात्र, भाजप आणि शेट्टर यांच्यातील वाद अजूनही संपण्याचं नाव घेत नाहीये.

लिंगायत नेत्यांची घेतली भेट

एकीकडं भाजपनं माझा नव्हे तर कर्नाटकातील जनतेचा अपमान केल्याचा आरोप शेट्टर करत आहेत, तर दुसरीकडं माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा (BS Yediyurappa) यांनी लिंगायत नेत्यांची भेट घेत शेट्टर यांना इशारा दिलाय. आम्ही दिवसरात्र काम करू, पण शेट्टर यांना विजयी होऊ देणार नाही, असं त्यांनी म्हटलंय.

Karnataka Election 2023
Muslim Reservation : भाजप सरकारला मोठा झटका; मुस्लिम आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टानं दिला महत्वाचा आदेश

'शेट्टरांना कोणत्याही परिस्थितीत जिंकू देणार नाही'

बीएस येडियुरप्पा म्हणाले, 'हुबळीमध्ये लिंगायत नेत्यांसोबत अत्यंत महत्त्वाची बैठक झाली आहे. या बैठकीत अनेक बडे लिंगायत नेते सहभागी झाले होते. मी त्यांना सांगितलं की, पक्ष मजबूत करायचा आहे. जगदीश शेट्टर यांना कोणत्याही परिस्थितीत विजयी होऊ द्यायचं नाही. त्यासाठी रात्रंदिवस मेहनत करायला हवी. आम्ही इथं मोठी रॅली आणि जाहीर सभा घेणार आहोत.'

Karnataka Election 2023
Karnataka Election : कर्नाटकात शेवटच्या क्षणी भाजपचीच सत्ता येणार; अमित शहांचा मोठा दावा

हुब्बळीत पत्रकारांशी बोलताना येडियुरप्पा म्हणाले, 'आम्ही इथं कठोर मेहनत घेऊ आणि शेट्टर येथून जिंकणार नाहीत याची काळजी घेऊ. भाजपनं हुबळी-धारवाड सेंट्रलमधून पक्षाचे सरचिटणीस महेश टेंगिकाई यांना उमेदवारी दिली आहे. हा जगदीश शेट्टर यांचा बालेकिल्ला आहे.'

Karnataka Election 2023
Rajaram Sugar Factory Result : 'राजाराम'वर महाडिकांची पुन्हा एकहाती सत्ता; तब्बल 21 जागांवर विजयी घौडदौड

10 मे रोजी निवडणूक

कर्नाटकातील सर्व 224 विधानसभा जागांसाठी 10 मे रोजी निवडणूक होणार आहे. तर, 13 मे रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणुकीत भाजप आणि काँग्रेसमध्ये थेट लढत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com