Karnataka Election : राहुल गांधींचं PM मोदींना ओपन चॅलेंज; म्हणाले, दलित-आदिवासी आणि ओबीसींना तुम्ही..

पंतप्रधान मोदी ओबीसींची (OBC) मतं घेतात, पण त्यांना ताकद देत नाहीत.
Karnataka Assembly Election 2023
Karnataka Assembly Election 2023esakal
Summary

भाजप आणि आरएसएस भारतात द्वेष आणि हिंसाचार पसरवत आहेत.

Karnataka Assembly Election 2023 : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी कर्नाटकातील बिदर (Karnataka Bidar), हमनाबाद इथं एका सभेला संबोधित केलं. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींवर (PM Modi) जोरदार निशाणा साधला.

राहुल गांधी म्हणाले, पंतप्रधान मोदी ओबीसींची (OBC) मतं घेतात, पण त्यांना ताकद देत नाहीत. मोदीजी, तुम्ही दलित, आदिवासी आणि ओबीसींना त्यांचे हक्क देऊ शकत नसाल तर बाजूला व्हा. आम्ही त्यांना त्यांचे हक्क देऊन दाखवू, असं खुलं आव्हान त्यांनी मोदींना दिलंय.

राहुल गांधींनी 'जितनी आबादी उतना हक्क' या हॅशटॅगखाली ट्विट केलंय. त्यात त्यांनी लिहिलंय, काँग्रेसनं सर्व जनतेला त्यांचे हक्क मिळवून देण्याचं आश्वासन दिलंय. 9 वर्षे झाली मोदीजींनी ओबीसींची मतं घेतली, पण त्यांनी ओबीसींसाठी काय केलं?

Karnataka Assembly Election 2023
Atiq Ahmad Murder : अतिक-अश्रफच्या हत्येनंतर ओवैसींचा संताप; म्हणाले, तुम्ही गिधाडं आहात, मृतदेह खा..

मोदीजी ओबीसींकडून मतं घेतात, पण त्यांना कधीच ताकद देत नाहीत. देशात 50 टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण मिळणार नाही, ही आरक्षणाची तफावत दूर करा आणि तेवढं आरक्षण सर्व दलित-आदिवासींना द्या. भारतात पहिल्यांदा लोकशाहीबद्दल कोणी बोललं असेल आणि लोकशाहीचा मार्ग दाखवला असेल तर ते बसवण्णाजी होते. कर्नाटकची बिदर ही 12 व्या शतकातील समाजसुधारक बसवण्णा यांची 'कर्मभूमी' आहे, असंही त्यांनी सांगितलं.

Karnataka Assembly Election 2023
Atiq Ahmad Murder : अतिक-अशरफच्या हत्येनंतर प्रियंका गांधींचा भाजपवर निशाणा; म्हणाल्या, जो कोणी असं..

जाहीर सभेला संबोधित करताना ते म्हणाले, आज आरएसएस आणि भाजपचे लोक लोकशाहीवर आक्रमण करत आहेत, हे दुःखद आहे. भाजप आणि आरएसएस बसवण्णा यांच्या समान भागीदारी, समान संधी या आदर्शांवर हल्ला करत आहेत. ते भारतात द्वेष आणि हिंसाचार पसरवत आहेत, असा आरोपही त्यांनी केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com