Karnataka Election Result 2023: मोदींनी दाखवली खिलाडू वृत्ती! विजयानंतर काँग्रेसचं अभिनंदन करत दिला सल्ला

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव झाला असून काँग्रेसनं स्पष्ट बहुमत मिळवलं आहे.
Karnataka Election Result 2023
Karnataka Election Result 2023

नवी दिल्ली : कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव झाला असून काँग्रेसनं स्पष्ट बहुमत मिळवलं आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विजयाबद्दल काँग्रेसचं अभिनंदन केलं आहे, पण सत्तेत आलेल्या काँग्रेसला एक सल्ला द्यायलाही ते विसरले नाहीत. (Karnataka Election Result 2023 PM Modi Congratulating Congress after victory in Karnataka)

पंतप्रधान मोदी यांनी ट्विट करत काँग्रसचं अभिनंदन केलं आहे. "कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील विजयाबद्दल काँग्रेस पक्षाचं अभिनंदन. जनतेच्या इच्छा-अकांक्षा पूर्ण करण्यासाठी माझ्या काँग्रेसला शुभेच्छा," असं ट्विट PM मोदींनी केलं आहे.

Karnataka Election Result 2023
Karnataka Election Result 2023: भाजपच्या पराभवावर ठाकरेंची जळजळीत प्रतिकिया; म्हणाले, मोदी-शहांच्या...

दरम्यान, कर्नाटकातील निवडणूक ही भाजपसाठी प्रतिष्ठेची होती कारण सत्ता राखण्याचं त्यांच्यासमोर आव्हान होतं. प्रामुख्यानं भाजप आणि काँग्रेस या दोन पक्षांमध्येच मुख्य लढत होती. यामध्ये निवडणुकोत्तर चाचण्यांमधून ती अंदाज वर्तवण्यात आले होते. काहींमध्ये मते काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळेल, तर काहींच्यामते काँग्रेस सर्वात मोठा पक्ष राहिलं पण त्यांना स्पष्ट बहुमत मिळणार नाही. तर काही चाचण्यांनुसार त्रिशंकू विधानसभा निर्माण होईल आणि यामध्ये जेडीएस किंग मेकर ठरेल असंही भाकीत करण्यात आलं होतं.

Karnataka Election Result 2023
Karnataka Election Result 2023: दणदणीत विजयानंतर कर्नाटकचा मुख्यमंत्री कोण होणार? खर्गे म्हणाले...

दक्षिणेतलं मोठं आणि एकमेव राज्यातील सत्ता टिकवण्यासाठी भाजपनं संपूर्ण ताकद पणाला लावली होती. पंतप्रधान मोदींनी स्वतः इथं २० हून अधिक जाहीर सभा घेतल्या, रोड शो केले. बजरंग बली, द केरला स्टोरी हे मुद्दे जाणीवपूर्णक भाजपनं प्रचारात आणले. पण याचा काहीही उपयोग झाला नाही आणि भाजपला मोठा पराभवाला सामोरं जावं लागलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com