Karnataka Election Result : काँग्रेसच्या गोटात हालचालींना वेग; घोडेबाजार थांबवण्यासाठी घेतला हा मोठा निर्णय !

कर्नाटकात काँग्रेसच्या गोटात हालचालींना वेग
Karnataka Election Result DK Shivkumar Siddaramaiah congress mlas going to Bengaluru
Karnataka Election Result DK Shivkumar Siddaramaiah congress mlas going to Bengaluru
Updated on

कर्नाटकात काँग्रेसच्या गोटात हालचालींना वेग आला आहे. घोडेबाजार थांबवण्यासाठी काँग्रेस कंबर कसत आहे. सध्या मतमोजीणी सुरु असून हाती आलेल्या निकालानुसार काँग्रेस आघाडीवर आहे. दरम्यान, मोठी अपडेट समोर आली आहे. (Karnataka Election Result DK Shivkumar Siddaramaiah congress mlas going to Bengaluru )

घोडेबाजार थांबवण्यासाठी काँग्रेसने सर्व आमदारांना बंगळुरूला बोलावंल आहे. नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नाही. पण कर्नाटकात काँग्रेसची सत्ता आल्यास मुख्यमंत्री कोण होणार? असा सवाल पक्षासह देशभरात उपस्थित होत आहे.

मुख्यमंत्रीपदासाठी संकटमोचक ठरलेले डी. के. शिवकुमार आणि सिद्धरामय्या यांच्या चुरस पाहायला मिळत आहे. सिद्धरामय्या हे माजी मुख्यमंत्री आहेत.

Karnataka Election Result DK Shivkumar Siddaramaiah congress mlas going to Bengaluru
Karnataka Election Result :भाजप काँग्रेसच्या चुरशीच्या लढाईत राहुल गांधींचे सूचक ट्विट

शिवकुमार यांनी निकालपूर्वी माध्यमांशी संवाद साधला होता. यावेळी त्यांनी, मुख्यमंत्रीपदासंदर्भातही भाष्य केलं. पक्ष जो निर्णय घेईल तो त्यांना मान्य असेल, असे शिवकुमार यांनी म्हटले होते. तसेच, निवडणुकीत काँग्रेस 140 हून अधिक जागा जिंकून सरकार स्थापन करेल, असा दावा देखील त्यांनी केला होता.

Karnataka Election Result DK Shivkumar Siddaramaiah congress mlas going to Bengaluru
Karnataka Election Result : सुरवातीच्या निकालांत भाजप-काँग्रेसमध्ये कांटे की टक्कर, कोणी घेतली किती आघाडी?

विधानसभेच्या संपूर्ण २२४ जागांसाठी मतदान पार पडलं. एक्झिट पोलनुसार, कर्नाटक विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपला धक्का बसण्याची चिन्ह आहेत. . निवडणुकीत काँग्रेस १०६ ते १२० जागा जिंकेल, असा अंदाज या एक्झिट पोलमध्ये वर्तवला गेला आहे. कर्नाटक सत्ता स्थापन करण्यासाठी बहुमताचा आकडा ११३ इतका आहे. तसंच मतांच्या टक्केवारीतही काँग्रेस भाजपला मागे टाकेल, असं अंदाज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Amravati MLC Election Result 2026
Siddaramaiah emotional speech after resignation
why did Siddaramaiah resign
Karnataka Congress leadership change latest news
Marathi News Esakal
www.esakal.com