कर्नाटकात काँग्रेसला मोठा झटका; माजी कॅबिनेट मंत्र्यानं सोडला पक्षाचा 'हात', भाजपात करणार प्रवेश! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pramod Madhwaraj

सिद्धरामय्या यांच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री राहिलेले माधवराज यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिलीय.

कर्नाटकात काँग्रेसला मोठा झटका; माजी कॅबिनेट मंत्र्यानं सोडला पक्षाचा 'हात'

कर्नाटकातील (Karnataka) काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी कॅबिनेट मंत्री प्रमोद माधवराज (Pramod Madhwaraj) यांनी पक्षाचा राजीनामा दिलाय. काँग्रेसनं माधवराज यांना नुकतंच कर्नाटक काँग्रेसचं (Karnataka Congress) उपाध्यक्ष पद दिलं होतं. कर्नाटकातील सिद्धरामय्या यांच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री राहिलेले प्रमोद माधवराज यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली असून आपला राजीनामा कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डीके शिवकुमार (DK Shivakumar) यांच्याकडं पाठवलाय.

प्रमोद माधवराज हे कोळी समाजातून येतात. माधवराज 2013 मध्ये कर्नाटकच्या उडुपी मतदारसंघातून आमदार झाले आहेत. दरम्यान, प्रमोद माधवराज लवकरच भाजपमध्ये प्रवेश करू शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

हेही वाचा: 2500 कोटींना मुख्यमंत्रीपदाची ऑफर; भाजपला आणखी कोणता पुरावा हवाय?

2016 मध्ये कर्नाटक सरकारमध्ये मंत्री

प्रमोद माधवराज यांना 2016 मध्ये काँग्रेसच्या सिद्धरामय्या सरकारमध्ये (Siddaramaiah Government) कॅबिनेट मंत्री करण्यात आलं होतं. त्यांना युवक, क्रीडा आणि मत्स्यव्यवसाय खातं देण्यात आलं होतं. या सरकारमध्ये ते कर्नाटकचे दहावे सर्वोच्च मंत्री होते. 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी ते जनता दलमध्ये सामील झाले होते. परंतु, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी त्यांच्या जागेसाठी प्रचार केला. कारण, जेडीएसची काँग्रेसशी युती होती. त्यांनी उडुपी-चिकमंगळूर लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या शोभा करंदलाजे यांच्या विरोधात निवडणूक लढवली, जिथं त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं.

Web Title: Karnataka Former Cabinet Minister Pramod Madhavaraj Resigns From Congress Udupi Constituency

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :KarnatakaCongress
go to top