2500 कोटींना मुख्यमंत्रीपदाची ऑफर; भाजपला आणखी कोणता पुरावा हवाय? काँग्रेसचा सवाल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Congress President DK Shivakumar

'2500 कोटींच्या बदल्यात त्यांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर कोणी दिली, हे भाजपनं सांगावं.'

2500 कोटींना मुख्यमंत्रीपदाची ऑफर; भाजपला आणखी कोणता पुरावा हवाय?

बेळगांव (कर्नाटक) : कर्नाटक (Karnataka) राज्यात नव्या राजकीय वादाला सुरुवात झालीय. फोडाफोडीचं राजकारण करत भाजपनं कर्नाटकमध्ये हातून गेलेली सत्ता परत आणली. मात्र, या काळात झालेलं राजकारण आता समोर आलं असून मुख्यमंत्रीपदासाठी आपल्याकडं 2500 कोटींची मागणी केल्याचा खळबळजनक दावा भाजप आमदारानं केलाय. त्यामुळं राज्यात राजकीय चर्चांना उधाण आलंय. यावर आता काँग्रेस पक्षानं (Congress) देखील जोरदार निशाणा साधलाय. भाजप आमदार बसनगौडा यत्नाळ-पाटील (BJP MLA Basangouda Yatnal-Patil) यांनी केलेल्या दाव्यानंतर काँग्रेस नेते डीके शिवकुमारांनी (Congress President DK Shivakumar) भाजपला (BJP) यापेक्षा आणखी कोणता पुरावा हवा? असा सवाल उपस्थित केलाय.

हेही वाचा: इटलीच्या 600 कंपन्यांमध्ये भारतातील 50 हजार कर्मचारी कामाला : लुइगी माइओ

एएनआयच्या वृत्तानुसार काँग्रेस अध्यक्ष डीके शिवकुमार म्हणाले, आमदार बसनगौडा यत्नाळ-पाटील यांच्याकडं सर्वकाही उपलब्ध असताना, भाजपला आणखी कोणते पुरावे हवे आहेत? आम्ही कोणाचाही राजीनामा मागत नाहीय. पण, 2500 कोटींच्या बदल्यात त्यांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर कोणी दिली, हे भाजपनं सांगावं. यत्नाळ-पाटील हे माजी मंत्री आहेत, त्यामुळं त्यांच्या वक्तव्याकडं दुर्लक्ष करू नये, असंही शिवकुमारांनी म्हटलंय. या प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेऊन गुन्हा दाखल करावा. तसेच हा राष्ट्रीय प्रश्न आहे. यावर देशात चर्चा व्हायला हवी, अशी मागणीही त्यांनी केलीय.

हेही वाचा: भाजप खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल

मुख्यमंत्री व्हायचं असेल, तर 2500 कोटी रुपये द्यावे लागतील, अशी मागणी आपल्याकडं करण्यात आली असल्याचा खळबळजनक दावा आमदार बसनगौडा यत्नाळ-पाटील (विजापूर, माजी केंद्रीय मंत्री) यांनी केला होता. राज्यातील काही दलालांनी आपल्याकडं मुख्यमंत्री होण्यासाठी मोठ्या रकमेची मागणी केली. 2500 कोटी रुपये दिल्यास आपल्याला मुख्यमंत्री करण्यात येईल, असं मला सांगण्यात आलं होतं. मात्र राजकारणात एक गोष्ट लक्षात ठेवा, अशा चोरांवर विश्वास ठेऊ नका, असं आवाहन देखील यत्नाळ यांनी केलं होतं. असे लबाड लोक तुमच्यापर्यंत पोहोचताच सोनिया गांधी (Sonia Gandhi) अथवा जेपी नड्डा (JP Nadda) यांची भेट घ्या, असंही ते म्हणाले होते. आता या प्रकणात काँग्रेस देखील उडी घेतलीय.

Web Title: Bjp Mla Basanagouda Yatnal Claim Of Cm Post For 2500 Cr Congress Dk Shivakumar Attack Bjp Karnataka

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :KarnatakaCongressBJP MLA
go to top