Karnataka accident during Ganesh Visarjan: कर्नाटकात भीषण दुर्घटना! गणेश विसर्जन मिरवणुकीत भरधाव ट्रक घुसला; आठ जणांचा मृत्यू

Karnataka Ganesh Visarjan truck accident : पाच जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता, तर तिघांनी रूग्णालयात जीव सोडला; अनेकजण गंभीर जखमी
A speeding truck rammed into a Ganesh Visarjan procession in Karnataka, leaving eight people dead and several injured.

A speeding truck rammed into a Ganesh Visarjan procession in Karnataka, leaving eight people dead and several injured.

esakal

Updated on

Karnataka accident News : कर्नाटकातील हसन जिल्ह्यात एक अतिशय भीषण दुर्घटना घडली आहे. होलेनारसीपुरा येथील मोसाले होसाहल्लीजवळ एका भरधाव मालवाहू ट्रकने थेट गणपती विसर्जन मिरवणुकीत घुसून आठ जणांचा जीव घेतला, शिवाय या ट्रकने अनेक जणांना जखमीही केले आहे.

गणपती विसर्जन मिरवणुकीत तल्लीन झालेल्या गणेश भक्तांवर भरधाव ट्रक आल्याने, एकच गोंधळ उडाला. ट्रकच्या धडकेने घटनास्थळीच पाच जणांचा मृत्यू झाला, तर तीन जणांनी रूग्णालयात जीव सोडला. याशिवाय या भीषण दुर्घटनेत अनेकजण गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

या दुर्घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना तातडीने रूग्णालयात हलवले. याप्रकरणी ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. ट्रक चालक नशेत होता का? ट्रकमध्ये काही तांत्रिक बिघाड उद्भवला होता का? की अन्य काही कारण होते याचा शोध पोलीस घेत आहेत.

दरम्यान, या भीषण दुर्घटनेवर केंद्रीय मंत्री एचडी कुमारस्वामी यांनी या शोक व्यक्त केला आहे आणि म्हटले की, 'ही एक अतिशय दुर्दैवी घटना आहे. देव मृतांच्या आत्म्यांना शांती देवो आणि शोकसंतप्त कुटुंबांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो. मी सर्व जखमींनी लवकर सुदृढ आरोग्य मिळावे यासाठी प्रार्थना करतो. जखमींना योग्य मोफत उपचार देण्यासाठी राज्य सरकारने पावले उचलावीत.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com