Karnataka Polls : कर्नाटक सरकारने मुस्लिमांचं आरक्षण काढून घेतलं! निवडणुकीपूर्वी भाजपची खेळी

Basavaraj Bommai
Basavaraj Bommai esakal

Karnataka Assembly Elections : कर्नाटकमध्ये निवडणुकीपूर्वी भाजपने मोठी खेळी करीत मुस्लिम आरक्षणाचा कोटा घटवला आहे. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या नेतृत्वाखालील सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे देशाचं लक्ष कर्नाटककडे लागून राहिलं आहे.

मुस्लिमांना १० टक्के ईडब्ल्यूएस कोट्यामध्ये वर्ग करुन मुस्लिमांचा ४ टक्के कोटा वोक्कालिगा (२ टक्के) आणि लिंगायत (२ टक्के) यांना देण्यात आलेला आहे.

शुक्रवारी झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारने आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांवरुन ५६ टक्क्यांपर्यंत वाढवली आहे. सरकारने मुस्लिमांचं ४ टक्के आरक्षण काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे. मुस्लिमांना आता १० टक्के ईडब्ल्यूएसमधून आरक्षण मिळेल.

हेही वाचाः एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!

नवीन फेरबदलांनुसार मुस्लिमांना ईडब्लूएस कोट्यामधून स्पर्धा करावी लागेल. ज्यामध्ये ब्राह्मण, वैश्य, मुदलिया, जैन आणि अन्य समाजाचा समावेश आहे.

कॅबिनेट बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधतांना मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले की, धार्मिक अल्पसंख्यकांचा कोटा संपुष्टात आणण्यात येणार आहे आणि कुठल्याही बदलांशिवाय ईडब्ल्यूएस आरक्षणामध्ये त्यांना समाविष्ट करण्यात येईल.

Basavaraj Bommai
DA: सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्राचं गिफ्ट! महागाई भत्ता 4 टक्क्यांनी वाढला; सरकारवर पडणार 'एवढा' बोजा

सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे मुस्लिमांचा ४ टक्के कोटा इतरांना वर्ग झाला. तसेच सरकारने एससी आणि एसटी प्रवर्गाचा कोटा वाढवला आहे. सरकारने लिंगायत आरक्षण 5% वरून 7% आणि वोक्कलिगा समाजाचे आरक्षण 4% वरून 6% करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांवरुन ५६ टक्क्यांवर पोहोचली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com