
राज्यात विकास कामांना प्रोत्साहन देण्यासाठी कर्नाटक सरकारने मोठं पाऊल उचललंय. प्रत्येक आमदाराला ५० कोटी रुपये देण्यात आले आहेत. उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी म्हटलं की, राज्य सरकार विकासाचा वेग वाढवण्याचा विचार करतंय. यासाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात ५० कोटी रुपये निधी दिला गेला आहे. यासाठी अर्थंसंकल्पात ८ हजार कोटींची तरतूद करण्यात आलीय.