कर्नाटकात पावसाचं थैमान; महिनाभरात 24 जणांचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Karnataka
कर्नाटकात पावसाचं थैमान; 24 जणांचा मृत्यू, 658 घरांची पडझड

कर्नाटकात पावसाचं थैमान; महिनाभरात 24 जणांचा मृत्यू

कर्नाटकमध्ये (Karnataka) पावसाने थैमान घातलं आहे. मुसळधार पावसामुळे अनेक भागांत जनजीवर विस्कळीत झालं आहे. पावसाचं स्वरूप एवढं मोठं होतं की यावेळी वेगवेळ्या घटनांत तब्बल 24 जणांचा मृत्यू झाला आहे. या पावसामुळे मोठ्या क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे. तर 658 घरांचे पूर्ण नुकसान झाले असून, 8495 घरांचे अंशत: नुकसान झाले आहे. किमान १९१ जनावरांचं देखील नुकसान झाल्याची नोंद आहे.

कर्नाटक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी रविवारी सांगितले की, या महिन्याच्या सुरुवातीपासून राज्यभरात संततधार पावसामुळे एकूण 24 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. प्राधिकरणाने 1 नोव्हेंबरपासून आतापर्यंत केलेल्या प्राथमिक नुकसान आणि नुकसानीच्या अंदाजानुसार, 658 घरांचे पूर्णपणे नुकसान झाले आहे, तर 8,495 घरांचे अंशत: नुकसान झाले आहे. मुख्यमंत्री कार्यालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे.

loading image
go to top