

Karnataka High Court Quashes Sexual Harassment Case
esakal
महिलेकडे अयोग्य किंवा अश्लील नजरेने पाहणे म्हणजे शरीरसुखाची मागणी करणे किंवा लैंगिक छळ करणे, असे आपोआप मानता येणार नाही, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण कर्नाटक उच्च न्यायालयाने नोंदवले आहे. केवळ अयोग्य नजरेने पाहिल्याच्या आरोपावरून भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ७५(१)(ii) अंतर्गत गुन्हा सिद्ध होत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले. या निरीक्षणासह न्यायालयाने संबंधित आरोपीविरुद्ध सुरू असलेली फौजदारी कार्यवाही रद्द केली.
सकाळ, साम, सरकारनामा, अॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा