बंगळूर : येथील एम. चिन्नास्वामी स्टेडियमजवळ झालेल्या चेंगराचेंगरी (Chinnaswamy Stampede) प्रकरणात आरसीबीच्या (RCB) मार्केटिंग प्रमुख निखिल सोसाळे याने मागितलेल्या अंतरिम जामिनावर कर्नाटक उच्च न्यायालयाने (Karnataka High Court) बुधवारी आपला निर्णय राखून ठेवला. आज (ता. १२) दुपारी २.३० वाजता आदेश जाहीर केला जाईल, असे न्यायालयाने सांगितले.