
'डिसेंबरपूर्वी विद्यार्थिनींना हिजाबमुळं कोणतीही अडचण नव्हती; पण आता..'
Karnataka Hijab Controversy : हिजाबच्या वादावरून (Karnataka Hijab Disputes) कर्नाटकात राजकारण (Karnataka Government) चांगलंच तापलंय. सत्ताधारी भाजप (BJP) आणि काँग्रेस पक्ष (Congress Party) आमनेसामने आहेत. दरम्यान, याप्रकरणी कर्नाटकच्या शिक्षणमंत्र्यांनी मोठं वक्तव्य केलंय. काही संघटना मुलींना भडकवण्याचं काम करत आहेत, असा आरोप शिक्षणमंत्री बी. सी. नागेश (B. C. Nagesh) यांनी केलाय.
शिक्षणमंत्री पुढे म्हणाले, डिसेंबरपूर्वी विद्यार्थिनींना हिजाबमुळं कोणतीही अडचण नव्हती. डिसेंबरपूर्वी मुली हिजाबशिवाय (Karnataka Hijab Row) शाळेत यायच्या. परंतु, आता चित्र बदललंय. उडुपीत 9 पीयू कॉलेज असून, त्यात केवळ एकाच कॉलेजमध्ये हा वाद सुरू झालाय. तसेच विद्यार्थिनींना गणवेश संहितेचं (Uniform Code) पालन करावं लागेल, असंही नागेश यांनी सांगितलंय. त्यामुळं कोर्टाच्या निकालाकडं लक्ष लागून राहिलंय. (Karnataka Education Minister on Hijab Controversy)
मंगळवारी उडुपी जिल्ह्यातील मणिपाल येथील महात्मा गांधी मेमोरियल कॉलेजमध्ये (Mahatma Gandhi Memorial College) भगवी शाल आणि हिजाब घातलेल्या विद्यार्थिनींच्या दोन गटांनी एकमेकांच्या विरोधात घोषणा दिल्यानं तणाव वाढला. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओत मुलांचा एक गट मंड्यामध्ये हिजाब परिधान केलेल्या मुलीसोबत गैरवर्तन करताना दिसत आहे. मात्र, सोशल मीडियावर या मुलीच्या बाजूनं समर्थनाचा वर्षाव झाला. हिजाब घालण्याच्या मागणीसाठी आपला विरोध सुरू ठेवण्याचा आग्रह धरणाऱ्या मुलीनं सांगितलं, की तिला शिक्षकांचा पाठिंबा आहे. त्यामुळं शिक्षणमंत्री कोणता निर्णय घेणार, हे महत्वाचं ठरणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.