

KPSC Recruitment Scam
esakal
बंगळूर : कर्नाटक लोकसेवा आयोगाच्या (केपीएससी) पशुवैद्यकीय अधिकारी भरती घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) पहिले आरोपपत्र दाखल केले आहे. सुमारे १, ५०० पानांच्या या आरोपपत्रात आयएएस अधिकारी ज्ञानेंद्रकुमार आणि या प्रकरणातील मुख्य सूत्रधार बसवराज कन्नाळे यांच्याविरोधात अनेक गंभीर आरोप केले आहेत. आरोपपत्रानुसार ८ आणि ९ जानेवारी रोजी अनेक व्हिलांचे आगाऊ आरक्षण केले होते.