Loksabha Election : काँग्रेसमध्ये दाखल झालेले माजी मुख्यमंत्री स्वगृही परतणार? भाजपकडून 'या' बड्या नेत्याला ऑफर!

भाजपचा त्याग करून काँग्रेसमध्ये (Congress) दाखल झालेले माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर (Jagadish Shettar) स्वगृही परतणार असल्याची चर्चा रंगली आहे.
Former Chief Minister Jagadish Shettar
Former Chief Minister Jagadish Shettaresakal
Summary

माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा आणि बसवराज बोम्मई यांनी शेट्टर यांना पुन्हा भाजपमध्ये आणण्याचा प्रयत्न चालविला आहे.

बंगळूर : गेल्यावर्षी विधानसभा निवडणुकीवेळी भाजपचा त्याग करून काँग्रेसमध्ये (Congress) दाखल झालेले माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर (Jagadish Shettar) स्वगृही परतणार असल्याची चर्चा रंगली आहे. शेट्टर यांना बेळगाव लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्‍यासाठी भाजप नेत्यांनीच पुढाकार घेतल्याचीही चर्चा सुरू आहे. शेट्टर यांची मनधरणी करण्यासाठी भाजप नेत्यांची एक टीम पुढे आली आहे.

शेट्टर यांना विधानसभा निवडणुकीत भाजपने (BJP) उमेदवारी डावलल्याने त्यांनी बंड केले. अखेर त्यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करून विधानसभा निवडणूक लढविली. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. मात्र, त्यांच्या प्रतिमेचा इतर मतदारसंघांवरही परिणाम होऊन भाजपच्या उमेदवारांचा पराभव झाला. अलीकडेच कॉंग्रेसने त्यांना विधान परिषदेवर निवडून दिले आहे.

Former Chief Minister Jagadish Shettar
मोठी बातमी! 'मंत्री नारायण राणे वाढत्या वयोमानामुळं लोकसभेची निवडणूक लढणार नाहीत'; नीलेश राणे यांची माहिती

शेट्टर हे बेळगावचे दिवंगत माजी खासदार सुरेश अंगडी (Suresh Angadi) यांचे जवळचे नातलग आहेत. बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणूनही त्यांनी काही काळ कार्य केले आहे. त्यामुळे मतदारसंघाची त्यांना चांगली माहिती असून, मतदारांशी चांगला संपर्कही आहे. शिवाय बेळगाव लोकसभा क्षेत्रातील लिंगायत मतदारांवर त्याचा प्रभाव पडू शकतो, असे भाजपचे मत आहे. माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा आणि बसवराज बोम्मई यांनी शेट्टर यांना पुन्हा भाजपमध्ये आणण्याचा प्रयत्न चालविला आहे. दोन दिवसांपूर्वी बंगळूरमध्ये झालेल्या भाजपच्या बैठकीत त्यावर चर्चा झाल्याचे समजते.

Former Chief Minister Jagadish Shettar
'खात्री बाळगा, शिंदे गटाचे 40 गद्दार आमदार लवकरच अपात्र होतील'; ठाकरे गटाच्या माजी खासदाराला विश्वास

काँग्रेसमध्येच राहणार

शेट्टर यांनीही आपण कोणत्याही कारणास्तव भाजपमध्ये जाणार नसून, काँग्रेसमध्येच राहणार असल्याचे सांगितले. मात्र, लोकसभा निवडणूक जसजशी जवळ येऊ लागली आहे. तसतसे राजकारणातील हालचालींना पुन्हा एकदा उधाण आले आहे. बी. वाय. विजयेंद्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर भाजपमध्ये वातावरण बदलले आहे. पक्ष सोडलेल्यांना पुन्हा पक्षात आणावे, अशी चर्चा सुरू झाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com