टिपू सुलतानला मुस्लिम गुंड म्हटलात, तर जीभ कापून टाकू; भाजपच्या बड्या मंत्र्याला धमकी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

KS Eshwarappa

आपण अशा धमक्यांना घाबरत नसल्याचं ईश्वरप्पांनी स्पष्ट केलंय.

टिपू सुलतानला मुस्लिम गुंड म्हटलात, तर जीभ कापून टाकू; भाजपच्या बड्या मंत्र्याला धमकी

कर्नाटकातील भाजप आमदार (BJP MLA) आणि राज्य सरकारमधील मंत्री केएस ईश्वरप्पा (KS Eshwarappa) यांनी टिपू सुलतानला (Tipu Sultan) मुस्लिम गुंडा म्हटलंय. त्यानंतर त्यांना लागलीच धमकीचं पत्र आलंय. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आलीय.

जर त्यांनी (ईश्वरप्पा) पुन्हा टिपू सुलतानला मुस्लिम गुंडा म्हटलं तर त्यांची जीभ कापण्यात येईल, असं या पत्रात लिहिलंय. हे पत्र त्यांच्या निवासस्थानाच्या पत्त्यावर पाठवण्यात आल्याचं बोललं जातंय. स्वातंत्र्य दिनानिमित्त कर्नाटकात टिपू सुलतान आणि सावरकर यांच्याबद्दल लावण्यात आलेल्या बॅनरमुळं वाद निर्माण झाला असतानाच आता भाजपचे आमदार ईश्वरप्पा यांनी एक वादग्रस्त विधान केलंय.

हेही वाचा: भारतीय जवानांनी बजावलं असंही कर्तव्य! जखमी झालेल्या पाकिस्तानी दहशतवाद्याला दिलं 'जीवदान'

ईश्वरप्पा म्हणाले, मी कधीही सर्व मुस्लिमांना गुंड म्हटलं नाही. आपण अशा धमक्यांना घाबरत नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. भाजपचे ज्येष्ठ नेते ईश्वरप्पा यांनी मंगळवारी अल्पसंख्याकांवर कर्नाटकातील शिवमोग्गा इथं जातीय तणाव पसरवल्याचा आरोप आहे. ते म्हणाले, "मला मुस्लिम समाजातील (Muslim Community) ज्येष्ठांना सांगायचं आहे की, मी असं म्हणत नाही की सर्व मुस्लिम गुंड आहेत. मुस्लिम समाजातील ज्येष्ठांनी यापूर्वी शांततेसाठी प्रयत्न केले आहेत. मी त्यांना आवाहन करेन की, त्यांना तरुणांना चांगला सल्ला द्यावा. ऐकलं नाही तर सरकार त्यांच्यावर कारवाई करेल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

हेही वाचा: Agneepath Scheme : अग्निपथ योजनेला स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाचा नकार

स्वातंत्र्य दिनानिमित्त अमीर अहमद सर्कलमध्ये वीर सावरकरांचं पोस्टर्स लावण्यात आलं होतं. ते हटवण्याचा प्रयत्न टिपू सुलतानच्या अनुयायांनी केल्याचा आरोप आहे. यानंतर जातीय तणाव निर्माण झाला आणि शिवमोग्गा जिल्ह्यातील काही भागात संचारबंदी लागू करण्यात आली होती.

Web Title: Karnataka Minister Ks Eshwarappa Called Tipu Sultan A Muslim Goon Received Threats To Cut Off His Tongue

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :KarnatakaBJP MLA