भारतीय जवानांनी बजावलं असंही कर्तव्य! जखमी झालेल्या पाकिस्तानी दहशतवाद्याला दिलं 'जीवदान'

पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या दहशतवाद्याला गोळी लागल्यानं जखमी झाला होता.
Indian Soldier
Indian Soldieresakal
Summary

पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या दहशतवाद्याला गोळी लागल्यानं जखमी झाला होता.

जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यात (Rajouri Jammu and Kashmir) सीमा चौकीवर हल्ला करण्यासाठी आलेल्या दहशतवाद्याला भारतीय जवानांनी (Indian soldier) आपलं रक्त (Blood Donation) दिलंय. बुधवारी माहिती देताना लष्करानं सांगितलं की, घुसखोरी आणि 21 ऑगस्ट रोजी सीमा चौकीवर झालेल्या हल्ल्यादरम्यान दहशतवादी (terrorist) जखमी झाला होता. त्यानंतर भारतीय लष्कराच्या (Indian Army) जवानांनी त्याला रक्ताच्या तीन बाटल्या दिल्या.

32 वर्षीय तबराक हुसेन (Tabarak Hussain) असं या दहशतवाद्याचं नाव असून तो पाकव्याप्त काश्मीरमधून आला होता. लष्कराच्या 80 इन्फंट्री ब्रिगेडचे कमांडर ब्रिगेडियर कपिल राणा (Brigadier Kapil Rana) यांनी सांगितलं की, 21 ऑगस्ट रोजी झांगढमध्ये तैनात असलेल्या सतर्क जवानांना नियंत्रण रेषेच्या (एलओसी) पलीकडं दोन ते तीन दहशतवाद्यांच्या हालचाली दिसल्या. एक दहशतवादी भारतीय चौकीजवळ आला आणि कुंपण कापण्याचा प्रयत्न केला. सतर्क सैनिकांनी त्याला आव्हान दिलं. मात्र, पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या दहशतवाद्याला गोळी लागल्यानं जखमी झाला. मागे लपलेले दोन दहशतवादी घनदाट जंगलाच्या आडून पळून गेले, असं अधिकाऱ्यानं सांगितलं. त्यानंतर जखमी पाकिस्तानी दहशतवाद्याला जिवंत पकडण्यात आलं आणि त्याच्यावर तात्काळ वैद्यकीय मदत देण्याबरोबरच शस्त्रक्रिया करण्यात आली.

Indian Soldier
नितीन गडकरींना भाजपच्या संसदीय मंडळातून हटवण्यास RSS ची होती संमती; मोठं 'कारण' आलं समोर

राजौरी येथील आर्मी हॉस्पिटलचे कमांडंट ब्रिगेडियर राजीव नायर यांनी सांगितलं की, दहशतवाद्याच्या मांडीला आणि खांद्याला दोन गोळ्या लागल्यानं रक्त वाहू लागलं होतं, त्याची प्रकृती चिंताजनक आहे. आमच्या टीमच्या सदस्यांनी त्याला तीन बाटल्या रक्त दिलं असून त्याच्यावर शस्त्रक्रिया करून आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलंय. हुसेननं त्याच्या चौकशीकर्त्यांना सांगितलं की, त्याला कर्नल युनूस चौधरी नावाच्या एका पाकिस्तानी गुप्तचर अधिकाऱ्यानं पाठवलं होतं. त्याला भारतीय चौकीवर हल्ला करण्यासाठी पाकिस्तानी चलनात 30,000 रुपये दिले होते. त्यानं इतर दहशतवाद्यांसह भारतीय फॉरवर्ड पोस्ट्सची रेकी केली होती. लष्कराच्या म्हणण्यानुसार चौधरीनं त्यांना 21 ऑगस्ट रोजी हल्ला करण्याची परवानगी दिली होती.

Indian Soldier
डीआयजींकडं दाद मागितली, पण..; घरी कोणी नसताना बलात्कार पीडितेनं लावून घेतला गळफास

हुसैन हा पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेसाठी दोन वर्षांपासून काम करत होता. एलओसी ओलांडून लष्कर-ए-तोयबाच्या प्रशिक्षण शिबिरात त्यानं सहा आठवड्यांचं प्रशिक्षण घेतलंय. 25 एप्रिल 2016 रोजी हुसैन आणि त्याचा भाऊ हारून अली यांना सब्जकोट येथून तीन दहशतवाद्यांसोबत पाठवण्यात आलं होतं, असं लष्करानं सांगितलंय. 16 डिसेंबर 2019 रोजी हुसैनचा दुसरा भाऊ मोहम्मद सईद याला त्याच भागात सैनिकांनी पकडलं होतं, असं लष्करानं सांगितलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com