भाजपनं 276 जागा जिंकून दाखवावं, मी राजीनामा देईन; मोदींच्या 'या' कृतीनं भावले माजी पंतप्रधान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

HD Devegowda

'निवडणुकी वेळी बोलल्या जाणाऱ्या गोष्टी इतक्या गांभीर्यानं घेतात का?, असं म्हणून मोदींनी माझा राजीनामा नाकारला.'

'भाजपनं 276 जागा जिंकून दाखवावं, मी राजीनामा देईन'

मंड्या (कर्नाटक) : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी लोकसभेचा (Lok Sabha Election) राजीनामा देण्याची माझी इच्छा नाकारल्यानंतर त्यांच्याबद्दलचा आदर अनेक पटीनं वाढला, असं मत माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा (HD Devegowda) यांनी रविवारी व्यक्त केलं. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपनं (BJP) 276 जागा जिंकून स्वबळावर सत्तेत आल्यास लोकसभेचा राजीनामा देईन, असं आव्हान देवेगौडांनी मोदींना दिलं होतं. यावर देवेगौडा म्हणाले, मी त्यांना सांगितलं की, जर तुम्ही 276 जागा जिंकल्या, तर मी माझ्या पदाचा राजीनामा देईन, असं खुलं आव्हान मी मोदींना दिलं होतं, असं ते म्हणाले.

दरम्यान, भाजप स्वबळावर सत्तेत आले. त्यानंतर देवेगौडांनी दिलेलं आश्वासन पूर्ण करण्याची इच्छा व्यक्त केली. JDS नेत्यानं आठवण करून दिली की, विजयानंतर मोदींनी त्यांना वैयक्तिकरित्या शपथविधी समारंभास उपस्थित राहण्यासाठी आमंत्रित केलं होतं. देवेगौडा म्हणाले, समारंभ संपल्यानंतर त्यांनी मोदींशी भेटीची वेळ मागितली, ती त्यांनी मान्यही केली. मोदींची गाडी संसदेच्या व्हरांड्यात पोहोचली, तेव्हा पंतप्रधान मोदी स्वत: माझं स्वागत करण्यासाठी तिथं आले.

हेही वाचा: शरद पवारांचा रामराजेंना फोन अन् अध्यक्षपदाची माळ पाटलांच्या गळ्यात

देवेगौडा पुढे म्हणाले, मला तेव्हा गुडघेदुखीचा त्रास होता, अजूनही तो आहे. ज्या दिवशी संसदेत माझी गाडी तिथं पोहोचली, त्याच दिवशी मोदी स्वतः तिथं आले. माझा हात धरून मला संसदेत घेऊन गेले. ज्या व्यक्तीनं मोदींना इतका विरोध केला, तरी देखील त्यांनी दाखलेलं कृत्य नक्कीच भावनारं होतं. देवेगौडांनी मोदींसमोर लोकसभेचा राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली. मी त्यांना सांगितलं, की मी माझ्या म्हणण्यावर ठाम आहे. कृपया माझा राजीनामा स्वीकारावा. यावर मोदींनी, निवडणुकी वेळी बोलल्या जाणाऱ्या गोष्टी इतक्या गांभीर्यानं घेतात का?, असं म्हणून त्यांनी माझा राजीनामा नाकारला, असं देवेगौडा म्हणाले. या घटनेनंतर देवेगौडा यांनी सहा ते सात वेळा मोदींची भेट घेतल्याने त्यांच्याबद्दलचा आदर आणखी वाढल्याचंही त्यांनी सांगितलं.

हेही वाचा: 2023 मध्ये भाजप मोदींच्या नेतृत्वात निवडणूक लढवणार; अमित शहा

Web Title: Karnataka Modi Had Turned Down My Desire To Resign After The 2014 Lok Sabha Elections Hd Deve Gowda

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :KarnatakaNarendra Modi
go to top