श्रद्धा हत्याकांडासारखीच घटना; 20 वर्षाच्या मुलानं बापाच्या मृतदेहाचे केले 32 तुकडे! Karnataka Crime | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Karnataka Murder Case

Karnataka Crime : श्रद्धा हत्याकांडासारखीच घटना; 20 वर्षाच्या मुलानं बापाच्या मृतदेहाचे केले 32 तुकडे!

Karnataka Murder Case : कर्नाटकच्या बागलकोटमध्ये एका 20 वर्षीय तरुणानं आपल्या वडिलांचे 32 तुकडे करून निघृण हत्या केल्याची बाब उजेडात आलीय. हत्येनंतर तरूणानं हे तुकडे शेतातील बोअरवेलमध्ये टाकले. हत्येचा खुलासा झाल्यानंतर पोलिसांनी JCB च्या मदतीनं बोअरवेल खोदून बॉडीपार्ट्स बाहेर काढले.

वडिलांच्या डोक्यात घातला लोखंडी रॉड

पोलिसांनी या प्रकरणी आरोपी विठ्ठल कुलाल याला बेड्या ठोकल्या आहेत. यासंबंधीच्या वृत्तानुसार, मंगळवारी विठ्ठलचे 54 वर्षीय वडील परशुराम कुलाल यांच्याशी उसाला पाणी देण्याच्या मुद्यावरून भांडण झालं होतं. या प्रकरणी परशुराम यांनी आपल्या मुलाला मारहाण केली होती. याचा राग मनात धरून आरोपी विठ्ठलनं आपल्या वडिलांच्या डोक्यात लोखंडी रॉड घातला. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

हेही वाचा: Narendra Modi : माजी पंतप्रधानांनी केलं मोदींचं तोंडभरुन कौतुक; विरोधकांच्या एकजुटीला बसणार धक्का?

श्रद्धा हत्याकांडासारखीच कर्नाटकात घटना

दिल्लीत श्रद्धा वालकरच्या हत्याकांडासारखीच घटना कर्नाटकातही घडलीय. पोलिसांनी सांगितलं की, आरोपी विठ्ठलनं हत्या केल्याची कबुली दिलीय. वडील नेहमीच दारुच्या नशेत असायचे आणि मारहाण, शिवीगाळ करायचे. हे सगळं सहन करू न शकल्यानं आपण हे कृत्य केल्याचं आरोपीनं पोलिसांना सांगितलं.

हेही वाचा: Nagpur Winter Session : सीमाप्रश्नावरून हिवाळी अधिवेशन गाजणार; CM शिंदे मांडणार ठराव

पत्नीनं दिलेल्या तक्रारीनंतर प्रकरणाचा उलगडा

मृत परशुराम यांना दोन मुलगे असून मोठा मुलगा आणि पत्नी हे मारहाणीमुळं गेल्या अनेक वर्षांपासून वेगळे राहत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोठ्या मुलानं आणि पत्नीनं दिलेल्या तक्रारीनंतर या प्रकरणाचा उलगडा झाला. परशुरामच्या रोजच्या मारहाणीला, त्रासाला वैतागून दोघांनी वेगळं राहण्याचा निर्णय घेतला होता. या घटनेनंतर कुटुंबीयांनी लहान मुलाला परशुराम यांच्याबद्दल विचारलं तेव्हा त्यानं हत्या केल्याचं सांगितलं. यानतंर कुटुंबीयांनी पोलिसांत जाऊन आरोपीविरुद्ध मुधोळ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. दिल्लीतही श्रद्धा नावाच्या मुलीची हत्या केल्यानंतर आरोपीनं तिच्या मृतदेहाचे 35 तुकडे करून जंगलात फेकले होते.