Nandini Milk Price Hike 2026
esakal
बंगळूर : जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्यांचे आर्थिक गणित बिघडले असतानाच सरकारने नंदिनी दुधाच्या दरात प्रतिलिटर आठ रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला (Nandini milk price increased by 8 rupees per litre) आहे. मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी (ता. २९) झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय झाला. सुधारित दर एक नोव्हेंबरपासून लागू होतील. मंत्रिमंडळ बैठकीनंतर कृषिमंत्री कृष्णा बैरेगौडा यांनी ही माहिती दिली.