Cardiac Arrest and Covid Vaccine Connection Denied : कर्नाटक राज्य सरकारने अचानक होणाऱ्या मृत्यूंच्या घटनांवर प्रकाश टाकण्यासाठी नियुक्त केलेल्या विशेष समितीने आपला अहवाल सादर केला आहे. यामध्ये स्पष्ट करण्यात आलंय, की कोविड-१९ लसीचा हृदयविकाराच्या (Heart Attack) झटक्यांशी कोणताही थेट संबंध नाही. याआधीही एम्स (AIIMS) आणि आयसीएमआर (ICMR) सारख्या राष्ट्रीय संस्थांनी यास दुजोरा दिला होता.