

Karnataka Petrol Controversy: 31.2% Ethanol Found in Samples
esakal
Karnataka ethanol petrol controversy: कर्नाटक राज्यात पेट्रोलमधील इथेनॉलच्या प्रमाणावरून नवा वाद निर्माण झाला आहे. राज्य सरकारने केलेल्या तपासणीत सात जिल्ह्यांमधील पेट्रोल पंपांवरून घेतलेल्या 14 नमुन्यांपैकी 11 नमुन्यांमध्ये केंद्र सरकारने निश्चित केलेल्या E20 मानकापेक्षा जास्त इथेनॉल आढळल्याचा दावा करण्यात आला आहे. या नमुन्यांमध्ये सर्वाधिक 31.2 टक्के इथेनॉलचे प्रमाण नोंदवण्यात आले आहे. E20 मानकानुसार पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल मिसळण्याची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.