

बंगळूर : टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचा पालघर येथील अपघातात मृत्यू झाल्याने केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मागच्या सीटवर बसणाऱ्या व्यक्तीलाही सीटबेल्ट अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर या निर्णयाची अंमलबजावणी कर्नाटक पोलिसांनी करायला सुरूवात केली आहे. कर्नाटक पोलिसांनी बुधवारी मोटार वाहन कायद्याच्या तरतुदींनुसार 1 हजार रुपये दंड ठोठावण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे मागील सीटवर बसलेल्या प्रवाशांनी सीट बेल्टचा वापर करणे अनिवार्य केले गेले आहे.
(Rs 1,000 Fine for Not Wearing Seat Belts on Rear Seats)
दरम्यान, अतिरिक्त पोलीस महासंचालक (एडीजीपी) आर. हितेंद्र यांनी जारी केलेल्या आदेशामध्ये सर्व पोलीस आयुक्तालये आणि एसपींना आदेशाचे पालन करण्यास सांगितले असून यामध्ये केंद्राच्या वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या 19 सप्टेंबरच्या पत्राचा उल्लेख आहे. सायरस मिस्त्री यांच्या अपघातानंतर केंद्रीय वाहतूक मंत्रालयाने हा निर्णय घेतला होता.
काय आहे आदेशात?
जारी केलेल्या आदेशानुसार, "194B च्या पोटकलम 1 नुसार, जो कोणी सीट बेल्ट न लावता वाहन चालवेल किंवा प्रवाशांना घेऊन जाईल तो 1 हजार रूपये दंडास पात्र असेल. त्याचबरोबर CMVR, 1989 च्या नियम -125(1) नुसार, मोटारसायकल आणि 3 चाकी वाहनांव्यतिरिक्त इतर सर्व वाहनांसाठी हा नियम लागू असेल. तसेच CMVR चा पुढील नियम -125(1) (a) नुसार ज्या गाडीमध्ये ड्रायव्हर व्यतिरिक्त आठपेक्षा जास्त जागा नसतील अशा सर्व वाहनांसाठी हा नियम लागू असेल" असं आदेशात सांगण्यात आलं आहे.
कर्नाटकात चालू वर्षात 7634 अपघाती मृत्यू
कर्नाटकमध्ये रस्त्यावरील अपघातामुळे प्रत्येक दिवसी सरासरी 31 जणांचा मृत्यू होतो (2022 मधील ऑगस्ट पर्यंतच्या आकडेवारीनुसार). तर पोलिसांच्या माहितीनुसार, कर्नाटकमध्ये 2022 या वर्षात 7 हजार 634 लोकांचा मृत्यू झाला असून बेळगाव, बंगळूर शहर आणि तुमाकुरू जिल्ह्यात सर्वांत जास्त अपघात होतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.