esakal | पोलिसांचा अंदाज खरा ठरला; जुन्या बिझनेस पार्टनरनंच केलं होतं 8 वर्षांच्या मुलाला किडनॅप!
sakal

बोलून बातमी शोधा

karnataka police, kidnap Case, Crime, ransom, bitcoin

17 डिसेंबर रोजी आजोबांसोबत मॉर्निंग वॉकला गेलेल्या 8 वर्षांच्या मुलाचे एका कारमधून अपहरण करण्यात आले होते. पोलिसांनी अपहरणकर्त्यांचा डाव उधळून लावत मुलाची सुखरुप सुटका केली आहे.

पोलिसांचा अंदाज खरा ठरला; जुन्या बिझनेस पार्टनरनंच केलं होतं 8 वर्षांच्या मुलाला किडनॅप!

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

कर्नाटकमधील उजिरे येथून अपहरण (Kidnap) केलेल्या 8 वर्षांच्या मुलाची कर्नाटक पोलिसांच्या विशेष पथकाने सुखरूप सुटका केली आहे. अरोपीने मुलाला किडनॅप केल्यानंतर त्याच्या वडिलांकडून 100 बिट क्वाईनच्या स्वरुपात खंडणी मागितली होती. सध्याच्या दरानुसार एवढ्या बिटकॉईनची किंमत जवळपास 17 कोटींच्या घरात जाते.

संबंधित मुलाच्या कुटुंबियांनी पोलिसात धाव घेतल्यानंतर अपहरणकर्त्याने 100 ऐवजी 60 बिटक्वाईन (Bitcoin) मागितले होते. पोलिसांना न सांगण्याची धमकीही कुटुंबियांना दिली होती. या प्रकरणाची तक्रार दाखल झाल्यानंतर अपहरणकर्ता संबंधित कुटुंबियांच्या जवळचा व्यक्ती असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला होता. पोलिसांचा हा संशय खरा निघाला आहे. 

सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, कल्चरल रिसर्च सेंटर तसेच लायब्ररी; अशी असेल अयोध्येतील मशीद

17 डिसेंबर रोजी आजोबांसोबत मॉर्निंग वॉकला गेलेल्या 8 वर्षांच्या मुलाचे एका कारमधून अपहरण करण्यात आले होते. पोलिस अधीक्षक लक्ष्मीप्रसाद यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात अटक करण्यात आलेला आरोपी हा अपहरणकर्त्या मुलाच्या वडिलांचा जुना बिझनेस पार्टनर आहे. बिटकॉईनचा दर वाढल्यानंतर आरोपीने पैसा उकळण्याच्या हेतून आपल्या पूर्वीच्या बिझनेस पार्टनरच्या मुलाचे अपहरण केले होते. अपहरणकर्त्या मुलाचे वडिलांचे नाव विजय असून ते लोकल बिझनेसमॅन आहेत. तर विजय यांचे वडिल सैन्य दलातील निवृत्त कर्मचारी आहेत.  

Farmer Protest: आंदोलनात जीव गमावणाऱ्यांसाठी शेतकऱ्यांकडून आज 'श्रद्धांजली दिवस'

अपहरणकर्त्या आरोपींना कोलार परिसरातून अटक करण्यात आली. या आरोपींनी सुरुवातीला 100 बिटक्वाईनची मागणी केली होती. कुटुंबिय तयार न झाल्याने त्यांनी सेटलमेंट करत असल्याचे सांगत 60 बिटकॉईनची मागणी केली होती. या प्रकरणाची तक्रार दाखल झाल्यानंतर दक्षिण कन्नड़ पोलीस अधीक्षक बीएम लक्ष्मी प्रसाद यांनी विशेष तपास पथकाची नियुक्ती केली होती. आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी चारमडी घाट जंगल परिसरात नाकाबंदी केली होती.  

loading image
go to top