esakal | सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, कल्चरल रिसर्च सेंटर तसेच लायब्ररी; अशी असेल अयोध्येतील मशीद
sakal

बोलून बातमी शोधा

mosque in ayodhya

अयोध्याजवळील धन्नीपूर गावात 5 एकर जमिनीवर बनणाऱ्या मशीदीचे डिझाइन सर्वांसमोर जाहीर करण्यात आलं आहे.

सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, कल्चरल रिसर्च सेंटर तसेच लायब्ररी; अशी असेल अयोध्येतील मशीद

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : अयोध्याजवळील धन्नीपूर गावात 5 एकर जमिनीवर बनणाऱ्या मशीदीचे डिझाइन जाहीर करण्यात आलं आहे. असं म्हटलं जातंय की या मशीदीत एकावेळी दोन हजार लोक नमाज पडू शकतात. तर या संपूर्ण मशीदीला सोलर लाईटमधून पॉवर सप्लाय मिळेल. जगातील सर्वांत वेगळ्या मॉडर्न डिझाइनच्या या मस्जिदीचे डिझाइन जामिया मिल्लिया इस्लामिया युनिव्हर्सिटीचे आर्किटेक्ट प्रोफेसर एसएम अख्तर यांनी केलं आहे. याबाबतची माहिती मशीदीची ट्रस्ट इंडो इस्लामिक कल्चरल फाऊंडेशनचे सचिव अतहर हुसैन यांनी दिली आहे. अयोध्या जमिनीच्या वादावर सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालानंतर इंडो इस्लामिक कल्चरल फाऊंडेशनची स्थापना उत्तर प्रदेशच्या सेंट्रल वक्फ बोर्डाद्वारे करण्यात आली होती. 

हेही वाचा - आंदोलनाची आठवण असावी; शेतकऱ्यांना मोफत टॅटू काढून देणारा स्टॉल

अतहर हुसैन यांनी म्हटलं की मशीदीचे नाव 'धन्नीपुर मस्जिद' असं दिलं गेलं आहे. यामध्ये सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, कल्चरल रिसर्च सेंटर, लायब्ररी तसेच किचन देखील असेल. मशीदीच्या परिसराचे डिझाइन आर्किटेक्ट प्रकाशित झाल्यानंतर याचा नकाशा पारित करण्याची प्रक्रिया सुरु केली जाईल. 26 जानेवारी अथवा 15 ऑगस्ट रोजी या मशीदीची पायाभरणी होईल, असा प्रयत्न असणार आहे.

अतहर हुसैन यांनी म्हटलं की, मॉडर्न डिझाइन असलेल्या या मशीदीत बाबरीच्या ढांच्याची कसलीही झलक दिसून येणार नाही. धन्नीपूर गावातील प्रधान राकेश कुमार यादव यांनी म्हटलं की हा परिसर मोठे धार्मिक केंद्र बनणार आहे. यामुळे या क्षेत्राचा विकास होईल.

आर्किटेक्ट प्रोफेसर अख्तर यांनी म्हटलंय की, हॉस्पिटल केवळ काँक्रीटचा ढांचा असणार नाही तर मशीदीच्या वास्तुकलेनुसार हा तयार केला जाईल. यामध्ये 300 बेड्सचे सुसज्ज व्यवस्था असेल जिथे डॉक्टर्स आजारी लोकांचा मोफत उपचार करतील.

loading image
go to top