esakal | अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला अटक; सेनेगलमधून ठोकल्या बेड्या
sakal

बोलून बातमी शोधा

अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला अटक; सेनेगलमधून ठोकल्या बेड्या

- अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला पुन्हा एकदा

अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला अटक; सेनेगलमधून ठोकल्या बेड्या

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली : अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला सेनेगलमध्ये अटक करण्यात आली. मुंबईसह देशभरातील पोलिसांना गुंगारा देत रवी पुजारी फिरत होता. त्याला आता अटक करण्यात आली. कर्नाटक पोलिसांची एक विशेष टीम गुन्हेगार हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सेनेगलमध्ये दाखल झाली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

गेल्या 20 वर्षांपासून मुंबईसह देशभरातील पोलिसांना गुंगारा देत रवी पुजारी फिरत होता. हा 'मोस्ट वाँटेड' गुन्हेगारांपैकी एक आहे. त्याला पश्चिम आफ्रिकेतील सेनेगलमधून अटक करण्यात आली. बंगळुरू पोलिसांनी त्याला अटक केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तसेच त्यांच्यासोबत रॉ’ चे अधिकारीही आहेत. रवी पुजारीवर हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी यांसारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे आहेत. 

वारिस पठाण यांनी शब्द मागे घेतले, माफी नाहीच 

मागील वर्षी अटक आणि सुटका

रवी पुजारी कर्नाटक, गुजरात आणि महाराष्ट्र या राज्यांतील व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणात परदेशातून खंडणीसाठी धमकावित असे. त्याला मागील वर्षी सेनेलगलमध्ये अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याची जामिनावर सुटका झाली.